नायपितॉ, (म्यानमार) :– म्यानमारमधील लष्करी राजवटीने देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तुरुंगातील तब्बल 7 हजार कैद्यांची शिक्षा माफ करून त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. म्यानमारमधील सरकारी वृत्तवाहिनीने आज ही माहिती दिली.
जगभरातील काही देशांनी म्यानमारला पाठिंबा दिल्याने संसद “जुंता’च्या प्रमुखांनी या देशांचे कौतुक केले आहे. म्यानमारमध्ये लष्करी शासन सत्तेवर आल्यापासून हा देश आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजूला पडला आहे. तसेच या देशावर अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध देखील लागू केले गेले आहेत.
मात्र याही स्थितीमध्ये काही आंतरराष्ट्रीय नेत्यांनी आणि काही देशांनी म्यानमारला पाठिंबा दिला आहे, असे म्यानमारच्या लष्कराचे वरिष्ठ जनरल मिन आंग ल्हाईंग यांनी स्वातंत्र्यदिनाच्या समारंभातील भाषणात सांगितले.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर अजित पवार ठाम, म्हणाले “मी कोणतेही चुकीचे…”
चीन, भारत, थायलंड, लाओस आणि बांगलादेशसारख्या काही देशांबरोबर जवळचे संबंध प्रस्थापित करण्याचा म्यानमारचा प्रयत्न आहे. सीमेवरील स्थैर्य आणि विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या वाटाघाटी सुरू आहेत, असेही मिन आंग ल्हाईंग यांनी राजधानी नायपितॉमधील लष्करी परेडच्यावेळी बोलताना सांगितले.