मुंबई : बॉलीवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीत समावेश असल्याचीही मोठी माहिती समोर आली आहे. कॉर्डेलिया या २ हजार प्रवासी क्षमतेच्या आलीशान क्रूझवर ड्रग्ज पार्टीचं आयोजन करण्यात आलं होत.
या क्रूझवर सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री छापा टाकला. यावेळी आर्यन खानसह १० हून अधिक मोठ्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
या छापेमारीनंतर आता बॉलीवूड किंग शाहरुख खान यांचा एका वक्तव्याची प्रचंड चर्चा रंगली आहे. यावेळी त्याने आपल्या मुलांबाबत वक्तव्य केलं असून त्याच्या वाक्याने सर्वांना हैराण करुन सोडलं आहे.
शाहरुखला जेव्हा पहिले पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्यावेळी 1997 मध्ये शाहरुख आणि गौरीने सीमा आग्रवालच्या टाॅक शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शाहरुखने आपल्या मुलासाठी एक वक्तव्य केलं. त्यानुसार त्याच्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्स घ्यावेत अशी माझी इच्छा असल्याचे शाहरुखने म्हटले होते . मात्र या वक्तव्याची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे.
दरम्यान, शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. मागील काही दिवसांपासून तो चित्रीकरणापासून लांब आहे मात्र सध्या तो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. आणि यातच हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री छापा टाकला. यावेळी आर्यन खानला ताब्यात घेण्याल्यामुळे शाहरुख खानचे ते वक्तव्य व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून बॉलीवूड किंग खानवर चांगलीच टीका होत आहे.