मोदींवर केलेली माझी भविष्यवाणी खरी ठरली – मणिशंकर अय्यर

नवी दिल्ली – वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा शिल्लक असताना पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. वृत्त संस्थेंच्या वृत्तानुसार,  2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘नीच प्रकारचा माणूस’ असा आपण केलेला योग्यच होता, असे सांगणारा लेख अय्यर यांनी लिहिला आहे. मोदींनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांचा आधार घेत मी तेव्हा बरोबर भविष्यवाणी केली होती की नाही? असे अय्यर यांनी या लेखात म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा मणिशंकर अय्यर कॉंग्रेसला अडचणीत आणू शकतात. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,’गेल्या डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांचा पहिला टप्पा जवळ आला असताना, अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख “नीच किस्म का आदमी’ असा केला होता. वास्तविक यात त्यांनी जातिवाचक उल्लेख बिलकुल केलेला नव्हता. तर वाईट स्वभावाबद्दल केलेली ती टीका होती. परंतु मोदी यांनी “नीच’ हा शब्द जातीशी जोडला. त्यामुळे या गोष्टीचा विपरीत परिणाम कॉंग्रेसच्या मतावर होऊ नये, म्हणून अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. अय्यर यांनी पंतप्रधानांची माफी मागावी, अशी ट्विप्पणीही राहुल गांधी यांनी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.