भारतातील काही भागातील रोड ट्रिप प्रचंड लोकप्रिय आहे. त्यात लडाख मधील किंवा भारतातील अनेक भागातील रोड ट्रिप करण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. या सगळ्यात तुम्ही या तीन रोड ट्रिप नक्की कराच.
मनाली ते लेह
अंतर – ४८० किमी
देशातील सर्वात सुंदर नजारा तुम्हाला या हायवेवर बघायला मिळेल. जवळपास ४८० किलोमीटरचे हे अंतर तुम्हाला रोमांचकारी अनुभव देईल. जर तुमच्याकडे बुलेट नसेल तर तुम्ही दिल्ली किंवा मनालीवरून ती भाड्याने सुद्धा घेऊ शकता. ही जवळपास दोन दिवसाची ट्रिप असेल फक्त तुम्ही जास्त आराम करू नका. या रस्त्यावर हवामानानुसार काही ठिकाणी चिखल, बर्फाचा रस्ता आणि नाले येतील, त्यांना न घाबरता फक्त ट्रिपची मज्जा घ्या.
चेन्नई ते पुडुचेरी, इस्ट कोस्ट रोड मार्गाने
अंतर – १६० किमी
ही ट्रीप तुम्हाला भारताच्या पूर्व तटावरून घेऊन जाते. सोबत डोंगर आणि नद्याही तुमच्यासोबत पळतील. याव्यतिरिक्त मार्गात कितीतरी ऐतिहासिक पर्यटन स्थळे सुद्धा तुमच्या स्वागतासाठी तयार असतात. जसे की, महाबलीपुरम, कल्पक्कम, मुदलीकरूपम आणि मारककनम. समुद्राचा नजारा घेत ही ट्रीप पुर्ण करु शकता.
मुंबई ते गोवा
अंतर – ५९१ किमी
या ट्रिप बद्दल तुम्हाला वेगळ्याने विशेष काही सांगायची गरज नाही. तुम्हा सर्वांनाच या मार्गाबद्दल माहिती असेल. या ट्रीपला ‘फादर ऑफ रोड ट्रिप्स’ पण म्हटले जाते, कारण ही ट्रीप आहेच तितकी साहसी! तुम्ही NH १७ आणि NH ४८ ने मस्तपैकी निसर्गाच्या वेगवगेळ्या रंगांचा आस्वाद घेत जवळपास १० तासांत ही ट्रिप पूर्ण करू शकता. पावसाळ्याची वेळ ह्या ट्रिपसाठी योग्य आहे.