शेतकरी आंदोलनामुळे रेल्वेला 1200 कोटींचा फटका

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या कृषीविषयक विधेयकाच्या विरोधात पंजाबात जे शेतकरी आंदोलन सुरू आहे त्यामुळे रेल्वेचे सुमारे 1200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.

अजूनही रेल्वेमार्गावर 32 ठिकाणी शेतकऱ्यांनी ठिय्या दिलेला आहे. त्यामुळे अजूनही तेथे रेल्वे सुरू करता आलेल्या नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने अनेक ठिकाणी जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करता आलेला नाही.

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ! मुंबई पोलीसांनी दाखल केला ‘हा’ नवा गुन्हा 

तसेच मोठ्या मालाची ने-आणही पूर्णपणे थांबली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेची हमी त्यांनी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, पंजाबमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दिल्लीतील सरकारने दखल न घेतल्याने आता हे शेतकरी दिल्लीत राजघाटावर जाऊन आंदोलन करणार आहेत.

मोठी बातमी ! लाॅकडाऊनच्या नियमांत शिथीलता; सिनेमागृहं, नाट्यगृहं अन् योगा क्लासबद्दल ठाकरे सरकारची मोठी घोषणा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.