नगर -करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभाग सुरक्षा समिती स्थापन केली आहे. या समितीत विद्यमान नगरसेवक व मनपाचे अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. ही समिती शहरात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहे असे, महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी पत्रकात म्हटले आहे.
महापालिकेच्या हद्दीत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रभाग सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसारा इतर जिल्ह्यातून येणारे विद्यार्थी, पर्यटक, शहरातील व्यक्तींचे नातेवाईकांची माहिती ही समितीद्वारे प्रशासनास दिली जाणार आहे. तसेच बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना परवानगी नसल्यास शहरात प्रवेश देऊ नये तसेच परवानगी असल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यांच्या हातावर क्वारनटाईनचे शिक्के मारून मनपाने निश्चित केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. तसेच करोना सदृष्यलक्षने दिसल्यास याची माहिती तात्काळ वैद्यकीय आरोग्य विभागास कळविले जाणार आहे.