चाकण -चाकण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. नीलम विक्रम पाटील यांनी खेडच्या न्यायालयात धाव घेतल्याने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. चाकणचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
मुख्याधिकारी डॉ. पाटील यांना त्यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्याप्रकरणी खेड न्यायालयाने तात्काळ अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. डॉ. पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्ष शेखर श्रीराम घोगरे यांनी मानहानीबाबत तक्रार दिली होती.
त्यावरून पोलिसांनी डॉ. पाटील यांच्यावरव ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता; मात्र त्यापूर्वीच डॉ. पाटील यांनी न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. तेथे त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.