नगर – सध्या करोनाला हरविण्यासाठी अहोरात्र डॉक्टर व परिचारिका जीवाचे रान करून सेवा देत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता परिचारिका सेवाभाव वृत्तीने आपले काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून सरकारने त्यांना प्रत्येकी सात हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी विश्व निर्मल फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केली.
परिचारिका दिनानिमित्त विश्वनिर्मल फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगाव येथील आरोग्य विभागातील परिचारिकेचा प्रशस्ती पत्र व मेडल देऊन सन्मान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. परिचारिका आपल्या कुटुंबाची काळजी न करता रात्रंदिवस समाजाची सेवा करीत आहेत. त्यामुळे त्यांना सानुग्रह अनुदान द्यावे असे बोज्जा यांनी म्हटले आहे.