जुन्या पदाधिकाऱ्यांच्या घरी मनपा कर्मचारी 

नगर – महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शहरातील रस्ते आणि कर्मचाऱ्यांचा गैरवापरावर सदस्यांनी जोरदार टीका केली. शिवेसेनेचे योगीराज गाडे यांनी रस्त्याच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत मागील तीन वर्षात झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली तर जुन्या पदाधिकाऱ्यांच्या घरी महापालिकेचे कर्मचारी कामाला असल्याचा आरोप सुभाष लोंढे यांनी केला.

स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांच्या अध्यक्षतेखाली आज सभा झाली. उपायुक्‍त सुनील पवार व प्रदीप पठारे, सदस्य कुमार वाकळे, अमोल येवले, गणेश कवडे, दिपाली बारस्कर व मनोज कोतकर हे सभेला उपस्थित होते. या सभेसमोर तब्बल 40 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. पाणी पुरवठ्याच्या “फेज-2′ योजनेच्या मुद्यावर या सभेतही वादंग झाले. 11 वर्षापासून ही योजना रखडल्याबद्दल सदस्यांनी तीव्र भावना व्यक्‍त केल्या.

सुभाष लोंढे, अविनाश घुले, सुवर्णा जाधव आदींनी टॅंकरच्या वाटपातील गोंधळावर बोलताना पैसे घेऊन टॅंकर दिले जातात, असा आरोप केला. अविनाश घुले यांनी हे टॅंकर कोणाचे आहेत, ती नावे जाहीर करण्याचा आग्रह धरला. याचवेळी योगीराज गाडे यांनी रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचारावर थेट आरोप करीत सन 2016 पासूनच्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली. या आरोपांमुळे शहर अभियंता सोनटक्के यांच्याशी त्यांची खडाजंगी झाली. लोंढे यांनी कर्मचाऱ्यांच्या मुद्दा उपस्थित केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.