मुंबई – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेची चौकशी केल्यानंतर मुंबई पोलिसांनी आता चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप व्हायला लागले आहेत. याच संदर्भात आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “एनसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या कटात समावेश असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेला आहे.
या संदर्भातील सॅम डिसोझाच्या जबाबामध्ये चिक्की पांडेचा उल्लेख आल्यामुळे मुंबई पोलिसांच्या विशेष चोकशी पथकाने चिक्की पांडेला समन्स पाठवले आहे. चिक्की पांडे पैशांच्या बॅगेसह लोअर परळ येथे आला होता, असे सॅम डिसोझाने दिलेल्या जबाबात म्हटलेले आहे.
किरण गोसावीने आर्यन खानच्या अटकेबद्दल सॅम डिसोझाला कळवले होते. त्यांना शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी हिच्याशी संपर्क करायचा होता. म्हणून त्यांनी मुंबईतील एका हॉटेल व्यवसायिकाच्या मदतीने चंकी पांडेचा बाऊ चिक्की पांडे याच्याशी संबर्क साधला.
त्यानंतर चिक्की पांडेने सॅम डिसोढाला पूजा दादलानी आणि तिच्या पतीच्या संपर्काचा तपशील मिळवून दिला होता. याची शहानिशा करण्यासाठी “एनसीबी’ने चिक्की पांडेला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.