मुंबई – मुंबईतील स्थानिक क्रिकेट मोसमाला यंदा येत्या शनिवारपासून प्रारंभ होत आहे. त्यातही शहरातील मानाच्या समजल्या जात असलेल्या तालीम करंडक स्पर्धेने स्पर्धात्मक क्रिकेटला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) कार्यकारी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुंबईचे माजी क्रिकेटपटू माधव मंत्री यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येत्या 29 ऑक्टोबरला एमसीएकडून एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
याचप्रमाणे यंदा एमसीएशी संलग्न सीफ ते जीफ विभागातील संघांसाठी माधव मंत्री जन्मशताब्दी स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.
ही स्पर्धा साखळी पद्धतीने पार पडेल. तसेच एमसीए कार्यकारी परिषदेच्या बैठकीत सर्व स्थायी समित्यांची पुनर्रचना करण्याच्या करारांबाबतही निर्णय घेण्यात आला.