air pollution – एनसीआरच्या हवेतील प्रदूषणाच्या पातळीत थोडी सुधारणा झाली आहे. राष्ट्रीय राजधानीतील हवेच्या गुणवत्तेत काहीशी सुधारणा झाल्यामुळे, कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CQAM) ने शनिवारी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) Grap-4 चे निर्बंध हटवले. मात्र, सध्या GRAP-3 अंतर्गत सर्व निर्बंध कायम राहतील. BS-3 आणि 4 इंजिन असलेल्या वाहनांना अजूनही सूट देण्यात आलेली नाही. तर दिल्लीत सोमवारपासून म्हणजेच २० नोव्हेंबरपासून सर्व शाळा सुरू होणार आहेत.
दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सोमवार, २० नोव्हेंबरपासून दिल्लीतील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये प्राथमिक ते १२वीपर्यंतचे वर्ग पुन्हा सुरू होतील.
मात्र, हा आदेश जारी झाल्यानंतर पुढील एक आठवडा मैदानी क्रीडा उपक्रम आणि सकाळच्या बैठका आयोजित केल्या जाणार नाहीत. दिल्ली-NCR चा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 400 च्या खाली आल्यानंतर, CQAM ग्रुप-4 चे निर्बंध हटवण्यात आले आहेत. तथापि, GRAP-3 अंतर्गत खाजगी बांधकाम आणि BS-3/4 डिझेल वाहनांवर बंदी कायम राहील.