लंडन – जगातील सर्वात जास्त गर्दीच्या शहरांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराने पाचवा क्रमांक पटकावला आहे पहिल्या टॉप टेन शहरांच्या यादी मध्ये रशिया आणि युक्रेनमधील तब्बल पाच शहरांचा समावेश आहे गेल्या वर्षी ही यादी जाहीर करण्यात आली होती.
तेव्हा टॉप 10 मध्ये भारतातील मुंबईसह नवी दिल्ली पुणे बेंगलोर या शहरांचाही समावेश होता गेल्या वर्षीच्या यादीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर होते आता मुंबई पाचव्या क्रमांकावर गेले असून या यादीतून पुणे आणि नवी दिल्ली बाहेर पडले आहेत तर बेंगलोर आता दहाव्या क्रमांकावर गेले आहे. या यादीमध्ये तुर्कस्तानमधील इस्तंबूल हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे.
रशियाची राजधानी मॉस्को दुसऱ्या क्रमांकावर युक्रेनची राजधानी कीव तिसऱ्या क्रमांकावर कोलंबियाची राजधानी बोगोटा चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राची राजधानी मुंबई पाचव्या क्रमांकावर युक्रेनमधील ओडिसा सहाव्या क्रमांकावर रशियामधील सेंट पिटर्सबर्ग सातव्या क्रमांकावर रोमानियातील बुखारेस्ट आठव्या क्रमांकावर रशियातील नोवोसिबीरस्क नवव्या क्रमांकावर आणि भारतातील बेंगलोर दहाव्या क्रमांकावर आहेत.
या शहरांमधून प्रवास करत असताना नागरिकांचा दरवर्षी किती वेळ ट्रॅफिकमध्ये वाया जातो या निकषावर ही यादी तयार करण्यात आली आहे त्याप्रमाणे पहिल्या क्रमांकावर असलेला इस्तंबुलमध्ये वार्षिक 142 तास वाया जातात भारताचा विचार करता या समस्येमुळे मुंबईत दर वर्षी 121 तास तर बेंगलोर मध्ये एकशे दहा तास वाया जातात असे या अहवालात म्हटले आहे.