मुंबई – दोनवेळचा विजेता ठरलेल्या कोलकाता नाइट रायडर्ससाठी यंदाच्या सत्रातील शेवटचा सामना हा ‘करो या मरो’ असा असून प्ले ऑफमध्ये पात्र ठरण्यासाठी त्यांना मुंबईविरुद्ध होणाऱ्या सामन्यात आज विजय आवश्यक आहे. तर 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेले मुंबई इंडियन्स पहिल्या स्थानासाठी मैदानात उतरणार आहेत.
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्तूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा मुंबई इंडियन्सने बाजूनं लागला आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असून कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
In other news, @mipaltan win the toss and elect to bowl first against @KKRiders.#MIvKKR pic.twitter.com/mh8CdTomCI
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2019
कोलकाता नाईट रायडर्स :
शुबमन गिल, क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, सुनील नारेन, नितीश राणा, रिंकु सिंह, प्रसिद्ध कृष्णा, हैरी गर्नी, संदीप वारियर
मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, काइरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, मिचेल मैकलेनेघन, राहुल चहर, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह