मुंबईत उलथापालथ होणार ? भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात; यशवंत जाधवांचा दावा

मुंबई – सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच विविध पक्षांमध्ये इनकमिंग होणार असं चित्र आहे. मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या विधानानंतर एकच खळबळ उडाली आहे.

पक्ष नेतृत्त्वाच्या मनमानी कारभाराला भाजपाचे काही नगरसेवक कंटाळले असून जवळपास १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.