मुकेश अंबानी सलग बाराव्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत

मुंबई : फोर्ब्ज मासिकाच्या सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानींनी सलग बाराव्या वर्षी पहिल्या स्थान कायम राखले आहे. तर आठ अंकांच्या भरारीसह गौतम अडाणी हे यंदाचे दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. विशेष म्हणजे या यादीत सामील असलेल्या पाच सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी तीन जण गुजराती आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 51.4 अब्ज डॉलर (3.5 लाख कोटी रुपये) आहे. तर गौतम अडाणी यांची एकूण संपत्ती 15.7 अब्ज डॉलर (1.10 लाख कोटी रुपये) आहे.
सर्वात श्रीमंत 100 भारतीयांच्या यादीत टॉप फाईव्हमध्ये तीन गुजराती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 81.9 अब्ज डॉलर (5.62 लाख कोटी रुपये) आहे. मुकेश अंबानींचे वडील गुजरातच्या चोरवाडमध्ये राहत होते. त्यांनी रिफायनरी, टेलिकॉमचा व्यवसाय केला. मुकेश अंबानींनी जिओद्वारे टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर त्यांना 28,000 कोटी रुपयांचा नफा झाला.

या यादीत महिंद्रा बॅंकेचे उदय कोटक पाचव्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 14.8 अब्ज डॉलर (1.02 लाख कोटी रुपये) एवढी आहे. कपाशीचा व्यवसाय करणारे, गुजराती कुटुंबातील उदय कोटक यांनी 1980 मध्ये एका फायनान्शिअल फर्मची स्थापना केली, जी आज कोटक महिंद्रा बॅंक म्हणून ओळखली जाते.

यंदा यादीत सहा नवे चेहरे
फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, ‘यंदा या यादीत सहा नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आहे. यामध्ये वेगाने वाढणारी ऍडटेक कंपनी बैजूचे संस्थापक बैजू रवींद्रन, हल्दीराम स्नॅक्‍सचे मनोहर लाल आणि मधुसूदन अग्रवाल, बाथरुम फिटिंग्स जॅग्वाआर ब्रॅण्डचे मालक राजेश मेहरा हे आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)