इचलकरंजीत पावणे दोन कोटीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबनूर येथे सुरू असलेल्या स्थिर पथकाकडून तपासणी करून एका कारमधील सुमारे पावणे दोन कोटीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाकडून याबाबत अधिक चौकशी सुरू असून यामुळे शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये कोल्हापूर रोड, स्टेशन रोड, नदीवेस नाका व यड्राव फाटा येथे स्थिर पथके आहेत. तर शुक्रवारी रात्री उशिरा इचलकरंजीहून कोल्हापूरकडे जाणारी कार संशयावरून थांबवण्यात आली. तपासणी केली असता यात साडे चार किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याबाबत आयकर विभागातील अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. शिवाजी नगर पोलिसात याप्रकरणाची नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, शिवाजी नगर पोलिसांनी रात्रगस्तीवेळी येथील पंचगंगा नदीवरील जुना पुलावर ३ किलो चांदी जप्त करण्यात आले आहे. याबाबत पोलिसात खातरजमा करण्याचे काम सुरू असून नोंद घेण्याचे काम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मोठ्या कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.