बॉलीवूडमधील कोरियोग्राफर रेमो डिसूझा याला चित्रपटसृष्टीत दोन दशकाहून अधिक काळ झाला आहे. त्याने आपल्या कोरियोग्राफरच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर केली आहे. त्याच्या टीव्ही शोलाही चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. त्याच्या मते, अजून खूप काही करण्याचे बाकी आहे.
रेमोने सध्या “मूव्ह लाइक रेमो’ हा ऑनलाइन डान्स क्लास आयोजित केला आहे. याबाबत तो म्हणाला की, सध्या जगातील परिस्थिती पाहता प्रत्यक्ष भेटणे खूपच कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत लाइव्ह ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून डान्स शिकविणे खूपच वेगळे वाटते. मात्र, हा अनुभव रोमांचकारक ठरणार आहे. या परिस्थितीत यापेक्षा चांगला अन्य कोणताही पर्याय असू शकत नाही.
View this post on Instagram
TO OUR WORLD LOVE YOU MAA AND LOVE YOU MY KIDS KI MAA # @lizelleremodsouza
क्योर डॉट फिटच्या माध्यमातून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांशी प्रेक्षकांना जोडणे ही एक मोठी संधी आहे. डान्स शोमध्ये अनेक वर्षे जज राहिल्यानंतर मला वाटले की, माझ्या प्रेक्षकांनी माझ्याशी खाजगीरित्या संपर्क साधण्याची गरज आहे. व्हर्चुअल रियालिटीच्या काळात हा सर्वात उत्तम टूल आहे. याच्या माध्यमातून कधीही, कोणाशीही, कोठेही संपर्क करता येतो.
दरम्यान, रेमोने ऋतिक रोशन बॉलीवूडमधील बेस्ट डान्सर असल्याचे म्हटले आहे. तसेच रणवीर सिंहसोबतच्या कोरियोग्राफचा अनुभवही त्याने शेअर केला.
View this post on Instagram
#look 3. #danceplus5 @starplus @hotstar @lizelleremodsouza @denishhamirani @sumit.baruah