एमएसएलटीए योनेक्स राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धा
पाचगणी – मुलींच्या गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या अदिती लाखे, अलिशा देवगावकर, गौरी मानगावकर, दिया चौधरी, सलोनी परिदा, स्वरा काटकर, कायरा चेतनानी व सिया प्रसादे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत येथे होत असलेल्या रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत आगेकुच केली.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात पहिल्या फेरीत संघर्षपुर्ण लढतीत महाराष्ट्राच्या अदिती लाखेने गुजरातच्या प्रियांका राणाचा 7-5, 4-6, 7-6(7) असा टायब्रेकमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. अलिशा देवगावकरने महाराष्ट्राच्याच आनंदी भुतडाचा 4-6, 6-2, 6-0 असा पराभव केला.
महाराष्ट्राच्या जिया परेरा हिने कर्नाटकच्या कशिश कांतचा 6-2, 6-4 असा तर सिया प्रसादेने राजस्थानच्या गती वैष्णवचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करत आगेकुच केली. महाराष्ट्राच्या कायरा चेतनानी हिने आपल्याच महाराष्ट्राच्याच एश्वर्या जाधवचा 7-6(2), 6-4 असा टायब्रेकमध्ये पराभव केला.
महाराष्ट्राच्या सलोनी परिदाने गुजरातच्या रिवा रावलानीचा 6-0, 6-1 असा तर स्वरा काटकरने महाराष्ट्राच्याच जेनिका जैसन हिचा 5-7, 6-1, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव केला.