मुंबई – ‘सुपर 30’ आणि ‘बाटला हाऊस’ या चित्रपटांमधील दमदार अभिनयानंतर अभिनेत्री ‘मृणाल ठाकू’र आता आगामी ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. टेलिव्हिजनवरून थेट बॉलिवूडच्या पडद्यावर झळकणारी मृणाल ठाकूर अभिनय असो वा बोल्ड फोटोशूट तिने अनेक आघाडीच्या नायिकांना मागे टाकले आहे. आणि आता मृणाल लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.
View this post on Instagram
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या स्वतःच्या नावाचा दमदार ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. सर्वच स्तरातून मृणालच्या अभिनयाचं कौतुक होत असतं. तिने 2012 मध्ये ‘मुझसे कुछ कहते हैं.. ये खामोशियां’ या मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. मात्र ‘कुमकुम भाग्य’ या टेलिव्हिजन शोमधून तिला खूप लोकप्रियता आणि स्वतःची वेगळी ओळख मिळाली.
View this post on Instagram
आणि त्यानंतर मृणाल बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसून आली. तिच्या या प्रवासाविषयी बोलताना ती म्हणाली, ‘मी माझे आयुष्य जगत आहे. मला लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचायचे आहे. ‘कुमकुम भाग्य’ने मला साथ दिली. माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे, लोकांचे मनोरंजन करत राहणे.’ एका प्रसिद्ध टीव्ही मुलाखतीत मृणालने आपल्या प्रवासाबद्दल संगितलं आहे.
View this post on Instagram
ती पुढे म्हणाली… ‘मी खूप नशीबवान आहे की, मला ही संधी मिळाली. अनेक टीव्ही कलाकार या संधीची वाट पाहत आहेत. मी खूप मेहनत केली आहे. मी खूप संघर्ष केला आहे. मी निर्लज्जपणे ऑडिशनसाठी उभी राहायची आणि जोपर्यंत मला घेतले जात नाही तोपर्यंत मी तिथून हालायचे नाही मी खूप हट्टी होते आणि अजूनही आहे.’ असं ती म्हणाली.
View this post on Instagram