पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होत आहे. जवळपास 290 पदांसाठी 2 लाख 51 हजार 589 अर्ज आले आहेत, अशी माहिती “एमपीएससी’कडून देण्यात आली आहे.
राज्यातील 37 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. यासाठी 4 ऑक्टोबर 2021 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. अर्ज करण्यासाठी 5 ते 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही परीक्षा शुल्क भरण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढविली आली. अखेर प्राप्त अर्जाची संख्या आयोगाने रविवारी ट्विट करीत जाहीर केले.
उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहायक राज्य कर आयुक्त, गटविकास अधिकारी आणि तत्सम पदे, वित्त व लेखा सेवा सहायक संचालक, उद्योग उपसंचालक, सहायक कामगार आयुक्त, उपशिक्षणाधिकारी आणि तत्सम पदे, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी अशी 290 पदे भरण्यात येणार आहे. तसेच मुख्य परीक्षा 7 ते 9 मे 2022 रोजी होणार आहे.