संगमनेर – विधानसभा निवडणुकीचा जोर अंतिम टप्यात आला असून संगमनेरातील निवडणुकीत मात्र अद्याप रंग भरलेला नाही. महायुतीच्या प्रचारासाठी दक्षिणेचे खासदार डॉ. सुजय विखे संगमनेरमध्ये दिसू लागले असून उत्तरेचे खासदार सदाशिव लोखंडे अध्यापही बेपत्ताच आहे.
संगमनेर मतदारसंघातून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महायुतीकडून शिवसेनेचे साहेबराव नवले निवडणूक लढवत आहे. नवलेच्या उमेदवारीने थोरातांसाठी निवडणूक सोप्पी झाल्याचे चर्चिले जात आहे. त्यामुळे नवलेंसाठी थेट नगरहून खा.विखे प्रचारात सक्रीय झाले आहे. मात्र नवले ज्या पक्षाकडून उमेदवारी करत आहे. त्या शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे मात्र अद्यापही नवालेंच्या प्रचारासाठी संगमनेरात दिसत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात न फिरकणाऱ्या लोखंडे यांचे दर्शन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच्या सभेच्या वेळी झाले होते. नंतर मात्र त्यांनी या मतदारसंघात प्रचार सभा घेतली नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना उत्तरेपेक्षा दक्षिणेचे खासदार जवळचे वाटू
लागले आहे.
अकोलेतही खासदारांची पाठ
अकोले मतदार संघातून भाजपचे उमेदवार असलेंल्या वैभव पिचड यांनी आणि मधुकर पिचड यांनी आघाडीचा बालक्कीला शाबूत ठेवत आघाडीचे उमेदवार कांबळे यांना मोठे मताधिक्य दिले होते. लोखंडे यांना या मतदारसंघातून समाधानकारण मताधिक्य न मिळाल्याने भाजपचे उमेदवार असलेल्या पिचड यांच्या प्रचारासाठी देखील त्यांनी पाठ फिरवल्याच्या बोलले जात आहे.