नवी दिल्ली – तृणमूल कॉंग्रेसचे (Trunmul Congress) खासदार साकेत गोखले (MP saket gokhale) यांनी सोमवारी दिल्ली पोलिसांना पत्र लिहून दिवाळीच्या रात्री फटाके फोडल्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही भाजपचे (Bjp) अनेक खासदार आणि मंत्री आपल्या परिसरात फटाके फोडत होते.
दिल्लीत कमालीचे हवा प्रदुषण (Delhi Air Pollution) निर्माण झाले असून त्याबाबत आपण दिलेल्या पत्रावर दिल्ली पोलिसांनी तात्काळ उत्तर देणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. काल रात्री दिल्लीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गेले. त्यामुळे दिल्लीच्या अनेक भागातील प्रदुषणाची पातळी 999 पेक्षा अधिक झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाची बंदी असूनही दिल्ली शहरात सर्रास फटाके (Diwali Crackers) विकले गेले आहेत आणि त्याचा मुक्त वापरही झाला आहे. माझ्या शेजारीच दिल्लीत राहणारे भाजपचे खासदार आणि मंत्री काल रात्री तासनतास फटाके फोडत होते, असे त्यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
Delhi Police needs to answer immediately & own responsibility for us breathing in a gas chamber
This morning, Delhi has woken up to a hazardous level of pollution with an AQI of 999+ thanks to bursting of fireworks last night.
Despite a ban by the Supreme Court, fireworks have… pic.twitter.com/dxuk38V3gF
— Saket Gokhale (@SaketGokhale) November 13, 2023
मी दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयाला (delhi Police) काल रात्री फटाक्यांच्या वापराची किती प्रकरणे नोंदवली गेली आणि कोणती कारवाई केली गेली, याचा तपशील देण्यास सांगितले आहे. फटाके फोडणाऱ्या भाजप नेत्यांवर पोलिसांनी किती तक्रारी नोंदवल्या याची माहितीही मी त्यांच्याकडे मागितली आहे, असे ते म्हणाले. दिल्लीच्या लोधीरोड, पंजाबी बाग या भागात मोठ्या प्रमाणात काल रात्री फटाक्यांचा वापर केला गेला असल्याचेही वृत्त आहे.