खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन

नवी दिल्ली  – लोकजनशक्ती पक्षाचे लोकसभा सदस्य रामचंद्र पासवान यांचे आज येथील राममनोहर लोहिया रूग्णालयात हदयविकाराने निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. केंद्रीय मंत्री व लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांचे ते लहान बंधु होत. बिहारच्या समस्तीपुर लोकसभा मतदार संघातून ते लोकसभेवर चार वेळा निवडून गेले आहेत.

गेले काहीं दिवस त्यांची तब्बेत बरी नव्हती. त्यातच त्यांना हदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी साडे दहाच्या सुमाराला त्यांचे निधन झाल्याची माहिती रूग्णालयाच्यावतीने देण्यात आली. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)