भोपाळ – बागेश्वर धामचे पीठाधिपती पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावाला अखेर आज अटक करण्यात आली. बंदुक दाखवून धमकावल्याच्या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर 9 दिवसांनी त्याला अटक करण्यात आली.
सौरव उर्फ शालीग्राम असे त्याचे नाव आहे. शालीग्रामचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तो हातात गावठी कट्टा घेऊन एका लग्न समारोहात लोकांना धमकावताना दिसत होता.
#RussiaUkraineWar : रशियाकडून पुन्हा एकदा आण्विक संघर्षाचा इशारा
पोलिसांनी अनुसूचित जाती- जमाती अधिनियमांतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच्या अटकेसाठी दलित संघटनांकडून दबाव वाढत होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत त्याच्या एका सहकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.