मुंबई : मथुरा येथील खासदार हेमा मालिनी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान, महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः मथुरा येथे परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल चर्चा केली.
Member of Parliament from Mathura Hema Malini met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan and discussed the issue of safe transportation of workers from Maharashtra to Mathura and to other parts of Uttar Pradesh. pic.twitter.com/QFeUhs7tAQ
— Governor of Maharashtra (@maha_governor) May 11, 2020
दरम्यान, महाराष्ट्रातून आपल्या गृहराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित मजुरांची संख्या अंदाजे १० लाखांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत स्थलांतरित मजूरांना घेऊन ३२ ट्रेन वेगवेगळ्या राज्यात गेल्या आहेत. महाराष्ट्र सरकार मजूरांना गृहराज्यात पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे.