Robotic cafe : सध्या जगात अनेक ठिकाणी रोबोटचा वापर केला जात आहे. अलीकडच्या काळात अनेक रेस्टॉरंटमध्ये देखील रोबो जेवण देताना दिसत आहेत. भारतात देखील याचा वापर आता सुरु झाला आहे. असेच काहीसे चित्र अहमदाबादमधील एका रेस्टॉरंटमध्ये पाहायला मिळाले आहे.
अहमदाबादमधील एका कॅफेमध्ये वेटर्सऐवजी रोबोचा वापर जेवण देण्यासाठी केला जात आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावरील कॅफेमध्ये रोबो ग्राहकाला बर्फाचा गोळा नेऊन देत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे पाहण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. या ठिकाणचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
कॅफेमध्ये काम करणाऱ्या या रोबोटचे नाव आयशा आहे. रोबोटिक्स कॅफेने त्याला वेटर म्हणून आपल्या टीममध्ये समाविष्ट केले आहे. हा रोबो घर किंवा ऑफिसमध्ये बसवण्यासाठी सुमारे 1 लाख 35 हजार रुपये खर्च येतो. आयशामुळे हा रोबोटिक्स कॅफे सतत चर्चेत असतो. यामुळे सोशल मीडियावरही लोकांचे लक्ष वेधले जात आहे.
या ठिकाणचा व्हिडीओ अहमदाबादच्या एका फूड ब्लॉगरने शेअर केले आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, अहमदाबादमध्ये पहिल्यांदाच रोबोट बर्फाचे गोळे सर्व्ह करत आहे. 40 रुपयांपासून सुरू होणारे स्वच्छ आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आईस्क्रीम बनवण्यासाठी ती व्यक्ती आधी दुधात चॉकलेट सिरप घालते आणि नंतर त्यात मिसळते. मग हे मिश्रण एका खास मशीनमध्ये ठेवले जाते जे द्रव बर्फात बदलते. यानंतर गोड चॉकलेट दूधाचे बारीक तुकडे केले जातात. चव आणखी वाढवण्यासाठी या डिशला ड्रायफ्रुट्स, रंगीबेरंगी हिरे आणि चॉकलेट सिरपने सजवले जाते.