देहूरोड – देशातील 41 आयुध निर्माणी कारखान्यांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णया विरोधात देहूरोड येथील आयुध निर्माणी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर कामगारांनी काळे झेंडे फडकवून प्रतिकात्मक पुतळ्याला जोडा मारत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.
ऑल इंडिया डिफेन्स एम्पलॉईज फेडरेशन (ंघटनेचे निसार शेख, गौतम कदम, सिद्धांत गायकवाड, प्रसाद कातकडे, धीरज लोहार, इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशनचे (INDWF) गजानन काळे, केतन खळदकर, रंजित पाटील, भारतीय प्रतीक्षा मजदूर संघ (BPMS) संघटनेचे दिलीप झाले, अशोक थोरात, रमेश रमन, विशाल उत्तम आणि ट्रेड युनियन कॉर्डीनेट कमिटी (TUCC) संघटनेचे मोहन घुले, प्रशांत कोकाटे, सलिम शेख, मिलिंद भालेराव, दिलीप भोंडवे, श्रीनाथ पोटावर, राकेश भोंडे, उमेश मानकर, रूपेश रणधिर, सुरेश कुंभार आदी या वेळी उपस्थित होते.