‘कुली नंबर 1’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज

मुंबई – 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘कुली नंबर 1’चा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेता वरून धवनने ‘कुली नंबर 1’ चित्रपटाचे मोशन पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या चित्रपटात वरून धवन आणि अभिनेत्री सारा अली खान ही धमाकेदार जोडी दिसून येणार आहे. त्यामुळे हा चित्रपट सिनेरसिकांसाठी एक चांगली मेजवानी ठरणार आहे.

चित्रपटाच्या पोस्टर मध्ये वरून कुलीच्या लुक मध्ये दिसून येत आहे. ‘कुली नंबर 1’ चित्रपटाचे निर्मिती प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन करणार असून, हा त्यांचा 45 वा चित्रपट असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.