नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांनाअनेक मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता आहे. मात्र या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अत्यंत भावुक करणारा क्षण विधिमंडळाच्या परिसरात पाहायला मिळाला. नाशिकच्या आमदार सरोज वाघ (अहिरे) या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या होत्या.
मी आई आहेच, सोबतच आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत. त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले, अशी भावना अहिरे यांनी व्यक्त केली.
यावेळी अहिरे यांनी,”प्रशंसक प्रवीण वाघ असे बाळाचे नाव आहे. ३० सप्टेंबरला त्याचा जन्म झाला. अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ यांच्यासह विधानभवनात पोहोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.