नवी दिल्ली – आई बाबा बाहेर गेले आहेत तू लगेच ये असा निरोप प्रियकराला प्रियसीने दिला. अतिउत्सहाच्या भरात प्रियकर देखील थेट प्रियसीच्या घरात घुसला. त्यानंतर पुढं झालं त्यावर कोणाचाही विश्वास बसने कठीण आहे. गपचूप घरात घुसणाऱ्या प्रियकराला चोर समजून मुलीच्या घरच्यांनी चोप दिला आणि एकच खळबळ उडाली.
झालं असं प्रेयसीला आपल्या प्रियकराला एक गिफ्ट द्यायचं होत म्हणून तिने प्रियकराला फोन करून घरी कोणीही नाही तू येऊन गिफ्ट घेऊन जा असं सांगितलं. अतीउत्सहाच्या भरात प्रियकर निघाला आणि त्याने गपचूप घरात प्रवेश केला. तेवढ्याच प्रेयसीच्या भावाने त्याला पाहिले आणि चोर समजून घरातील इतर सदस्यांना बोलावून चांगलाच चोप दिला. मार इतका जबरदस्त होता कि जखमी प्रियकराला आरोग्य केंद्रात दाखल करावे लागले.
हा गोंधळ इतका मोठा होता की,घरच्यांच्या आवाजाने आजूबाजूचे शेजारी देखील नेमकं काय झाले हे पाहण्यासाठी त्यांच्या घरी जमले. गोंधळ शांत झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. प्रकृती स्थिर असली तरी तरुणाला उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तरप्रदेशच्या बांदा येथील बिसंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी तक्रार देखील दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.