इच्छुकांसाठी ‘मोस्ट वॉन्टेड’ कसबा मतदारसंघ

पुणे-कसबा (215)

पुण्यातील आठ मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षासाठी सगळ्यात “सेफ झोन’ असणारा मतदार संघ म्हणजे “कसबा’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भाजप कार्यकर्त्यासाठी इथे निवडून येणे जेवढे सोपे तेवढेच येथे काम करणे अधिक अवघड समजले जाते. गिरीश बापट खासदार झाल्यामुळे 25 वर्षानंतर हा मतदारसंघ आता अन्य कार्यकर्त्यांसाठी मोकळा झाला आहे. त्यामुळे आता तो इच्छुकांसाठी अक्षरश: “मोस्ट वॉन्टेड’ झाला आहे.

पेठेतीलच इच्छुक नगरसेवकाला आमदारकी द्यायची आणि त्याच्या जागी बापटांच्या सुनेला पोटनिवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आणायचे अशी खेळी सुरू असल्याची चर्चा दुसऱ्या एका गोटातून सुरू आहे. साहजिकच येथील उमेदवार निवडताना बापट यांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. परंतु कोणाला उमेदवारी मिळणार, याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

सुमारे 1978 पासून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. 1985 मध्ये येथे कॉंग्रेसची सत्ता आली. त्यानंतर कॉंग्रेसकडून उल्हास काळोखे निवडून आले. त्यानंतर अण्णा जोशी आमदार झाले. पुढे ते खासदार म्हणून निवडून आल्यानंतर येथील पोटनिवडणुकीत पुन्हा ही जागा कॉंग्रेसकडे गेली. बापट यांचा पराभव करून कॉंग्रेसचे वसंत थोरात निवडून आले. त्यानंतर मात्र 1995 पासून ही जागा भाजपकडून अन्य कोणाकडेही गेली नाही आणि उमेदवारही बदलला नाही.

या भागातून आमदार म्हणून नेतृत्त्व करताना बापट यांना 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आता बापट खासदार झाल्यानंतर ही जागा अन्य उमेदवारांसाठी आता “ओपन’ झाली आहे. त्यामुळे येथून उमेदवारी मिळण्यासाठी भाजपेयींच्या अक्षरश: उड्या पडल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहता मोदी लाट अद्याप तशीच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आताही तीच परिस्थिती असेल “केवळ तिकिट घेणे आणि निवडून येणे’ असाच अनेक इच्छुकांचा समज असल्याने उमेदवारीसाठी उड्या पडल्या आहेत. त्यातून कसबासारख्या मतदार संघात तिकिट मिळाल्यास निवडणुकीच्या आधीच “आमदार झाल्यासारखं वाटतंय’ हे गाणं मनात रुंजी घातल्याशिवाय राहणार नाही.

ही जागा मोकळी झाल्याने सध्या महापालिकेत नगरसेवक असलेल्या नेत्यांनी दावेदारी सांगण्याला सुरूवात केली आहे. कार्यअहवाल, गणेशोत्सव आणि अन्य माध्यमातून त्यांनी एकप्रकारे शक्तीप्रदर्शनच सुरू केले आहे. नुकत्याच झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत नऊ जणांनी मुलाखतीही दिल्या आहेत. त्यातील काही विद्यमान आहेत तर काही माजी नगरसेवक, पदाधिकारी आहेत.

पेठेतीलच इच्छुक नगरसेवकाला आमदारकी द्यायची आणि त्याच्या जागी बापटांच्या सुनेला पोटनिवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आणायचे अशी खेळी सुरू असल्याची चर्चा दुसऱ्या एका गोटातून सुरू आहे. साहजिकच येथील उमेदवार निवडताना बापट यांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. परंतु कोणाला उमेदवारी मिळणार, याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

कसब्यामध्ये अन्य पक्षांकडून “स्ट्रॉंग’ विरोधक नाही. या मतदार संघात मुस्लिम, तेलुगु समाज, ब्राह्मण आणि अन्य अशा समाजाची मांदियाळी असल्याने हा भाग “कॉस्मोपॉलिटन’ आहे. कॉंग्रेसमधून तीन इच्छुकांची चर्चा सुरू आहे. त्यातील दोनजण विद्यमान नगरसेवक आहेत. तर मनसे विधानसभा लढवणार की नाही, हे अद्याप पक्षश्रेष्ठींनी जाहीरच केले नाही. त्यामुळे त्यांच्यातील उमेदवारांची अद्याप चर्चाही सुरू झाली नाही. वंचित आघाडी आणि एमआयएमचाही अद्याप निर्णय झाला नसल्याने त्यांच्याही उमेदवारांची चर्चा सुरू झाली नाही.

असा आहे कसबा मतदार संघ
हा मतदार संघ बहुतांश पेठांचाच आहे. कसबा पेठ, नारायण पेठ, भवानी पेठ, घोरपडी पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, नवीपेठ, गुरूवार पेठ, गणेश पेठ, लोहियानगर आणि दत्तवाडीतील काही भाग असा येतो. मतदार संघांचा विस्तार झाल्यानंतर कसबा मतदार संघात लोहियानगर आणि भवानी पेठ हा भाग जोडला गेला. हा भाग बहुतांश कॉंग्रेस “माईंड’ असतानाही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी बापट यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्यांनी या भागातही आपली पकड कायम ठेवली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)