24 तासांमध्ये 94 हजारापेक्षा जास्त रुग्ण झाले बरे

नवी दिल्ली – भारतामध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोविड-19 रुग्ण विक्रमी संख्येने बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 94 हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. या आकडेवारीनुसार भारतामध्ये आता कोविड-19 आजारातून बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या 43 लाखांपेक्षा जास्त आहे. देशाचे कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता 79 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला आहे. 

करोना विषाणूची नव्याने लागण झालेल्या रुग्णांपैकी 60 टक्के रुग्णसंख्या पाच राज्यांमध्ये आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू यांचा समावेश आहे. कोविडचे नव्याने सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

महाराष्ट्रात 23 हजारापेक्षा जास्त नवीन करोनाबाधित झाले आहेत. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात एका दिवसामध्ये 10 हजारापेक्षा जास्त कोविडबाधित बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये नव्याने एकूण 92,605 जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या नव्या रुग्णांपैकी 52 टक्के रुग्ण पाच राज्यांमध्ये आहेत. या राज्यांमध्ये सर्वात जास्त कोविडबाधित असल्याची नोंद आहे. महाराष्ट्रामध्ये 20 हजारांपेक्षा जास्त कोविडचे नवीन रुग्ण आढळले आहेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये 8 हजारपेक्षा जास्त रुग्ण गेल्या 24 तासांमध्ये आढळले आहेत.

देशामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोविड-19 मुळे 1,113 जणांचे निधन झाले. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी 425 जण महाराष्ट्रातले आहेत. त्याखालोखाल कर्नाटक आणि उत्तर प्रदेशामध्ये अनुक्रमे 114 आणि 84 करोनाबाधितांचे निधन झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.