लंडन – आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही लंडनमधील एक जोडप्याने आपला लग्नाचा वाढदिवस चक्क शववाहिकेतून प्रवास करून साजरा केला.
इंग्लंडमधील वेल्श भागात राहणाऱ्या स्टीव्ह आणि हेन्री यांनी आपल्या लग्नाचा ३० व वाढीदिवस साजरा करण्यासाठी हा अनोखा मार्ग निवडला त्यांनी एक शववाहिका खरेदी केली आणि केले या गाडीत शवपेटीच्या आकाराचा बेड बनवण्यात आला या बेडच्या भोवती हाडाचे सापळे ठेवण्यात आले.
अशाप्रकारच्या गाडीतुन तब्बल ३२० किलोमीटर यात्रा करून या जोडप्याने आपला लग्नाचा वाढदिवस साजरा केला त्यांनी हि गाडी १००० पौंडांना खरेदी केली होती आणि त्याच्या सुधारनेसाठी १५०० पौंड खर्च केले या संपूर्ण यात्रेत हे जोडपे शवपेटीतच झोपत होते यात्रा संपल्यावर स्टीव्हने हेन्रीला वेडिंग रिंग घातली आणि यात्रेचा समारोप केला