`कॅम्स’चा आयपीओ सोमवारपासून खुला

Madhuvan

कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीची प्रारंभिक भाग विक्री (आयपीओ) गुंतवणूकदारांसाठी सोमवारपासून खुला होत आहे. या कंपनीचे 1 ऑक्टोबरच्या आसपास शेअर बाजारात पदार्पण होईल.

आयपीओ 21 ते 23 ऑक्टोबरपर्यंत खुला असणार आहे. 28 सप्टेंबरपर्यंत समभागांच्या वाटपाचे काम पूर्ण होईल आणि ज्यांना समभाग मिळणार नाहीत त्यांना 29 सप्टेंबरला रिफंड मिळेल. ज्यांना समभाग मिळतील त्यांच्या खात्यावर ते 30 सप्टेंबरपर्यंत जमा होतील. या भाग विक्रीद्वारे 1,82,46,600 समभागांची विक्री करण्यात येणार आहेत.

त्यापैकी 1,82,500 समभाग कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत. कमीत कमी 12 शेअर किंवा त्या पटीत मागणीसाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी 1229 ते 1230 रुपये असा किंमत पट्टा ठेवण्यात आला आहे. त्यातून कंपनी सुमारे 2244.3 कोटी रुपये उभे करणार आहे.

कंपनी म्युच्युअल फंड आणि वित्त संस्थांना तंत्रज्ञानाधारीत सेवा आणि वित्तीय पायाभूत सुविधा देण्याच्या क्षेत्रात काम करते. या कामाचा कंपनीकडे गेल्या दोन दशकांचा अनुभव आहे. म्युच्युअल फंडांसाठी नोंदणी आणि हस्तांतरण करणारी एजंट म्हणून कार्यरत असणारी कॅम्स ही या क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते.

याखेरीज कंपनी पर्यायी गुंतवणूक फंड, विमा कंपन्या, बँका आणि बिगर बँकिंग वित्त संस्थांनाही विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरवते. मोठ्या आणि वाढत असलेल्या म्युच्युअल फंड सेवा व्यवसायतील क्लायंटशी असलेले दीर्घकालीन संबंध आणि एकात्मिक व्यवसाय मॉडेल ह्या कंपनीच्या जमेच्या बाजू आहेत. अनुभवी व्यवस्थापन आणि संचालक मंडळ ही देखील कंपनीची ताकद आहे.

कंपनीने 2019 च्या आर्थिक वर्षात शेअरमागे 22.47 रुपये लाभांश दिलेला आहे तर 2020 मध्ये प्रति शेअर 12.18 रुपये लाभांश दिलेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.