Actress Spruha Joshi – मराठी चित्रपटश्रुष्टीत आपली वेगळी छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री ‘स्पृहा जोशी’ नेहमीच आपल्या कलागुणांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते, मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट यामध्ये स्पृहाने साकारलेल्या विलक्षण भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहे. ‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडेंची स्पृहाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे.
‘स्पृहा जोशी’ नेहमीच सोशल मीडियावर आपल्या लाइफचे अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते अशात नुकतेच स्पृहाने एक ट्रेंडिग व्हिडीओ केला आहे. ज्यामधून पुढील पाच वर्षांचे तिचे प्लॅन्स काय असणार आहेत? हे सांगण्यात आलं आहे. “पुढील पाच वर्षांसाठी माझे प्लॅन्स…” स्पृहाने शेअर केला आहे. या विडिओमध्ये तिने आपल्या प्लॅन्सबाबत सांगितले आहे.
तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तू खूप सुंदर दिसतेस”, “तू माझी क्रश आहेस” अशा अनेक प्रतिक्रिया स्पृहाच्या व्हिडीओवर आल्या आहेत. दरम्यान, स्पृहाने नुकतंच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर साडी परिधान केल्याचे काही फोटो शेअर असून, त्यात ती खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. स्पृहा या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.