जगात असे अनेक लोक आहेत जे लहानपणापासून विलासी जीवन जगतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी त्याच्या वडिलांना बरीच वर्षे लागली असली तरी ‘या’ मुलाने वयाच्या नवव्या वर्षीच हे स्थान मिळवले आहे. हा चिमुकला मुलगा आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत मुलगा ठरला आहे. या मुलाकडे वयाच्या नवव्या वर्षातच इतकी संपत्ती आहे, ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जाणून घेऊया या श्रीमंत मुलाबद्दल…
आफ्रिकेतील या सर्वात श्रीमंत मुलाचे नाव ‘मोम्फा ज्युनियर’ अवल मुस्तफा आहे, जो वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी अफाट संपत्तीचा मालक बनला आहे. या मुलाकडे ब्रँडेड कपडे, घड्याळे, शूज आणि गाड्यांपासून सर्वकाही आहे. या मुलाकडे महागड्या गाड्या आणि स्वतःचे खाजगी जेट देखील आहे.
मोम्फा ज्युनियर हा अब्जाधीश मुलगा मोम्फा ज्युनियर नायजेरियातील लागोसचा रहिवासी आहे. त्याचे वडील नायजेरियन इंटरनेट सेलिब्रिटी इस्मालिया मुस्तफा आहेत. मोम्फा ज्युनियरला वयाच्या 6 व्या वर्षी त्याचे वडील इस्मालिया मुस्तफा यांनी चांदीच्या रंगाची बेंटले कार भेट दिली होती.
मोम्फा ज्युनियर आपल्या जेटने जगभर फिरतो. मोम्फा अवल मुस्तफाला इंस्टाग्राम अकाउंटवर 1 मिलियन लोक फॉलो करतात. मोम्फा त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या लक्झरी लाइफचे फोटो पोस्ट करतो.
इंस्टाग्रामवर वडील आणि मुलगा दोघेही खाजगी जेट, आलिशान कार आणि बंगल्यांचे फोटो शेअर करतात. फक्त डिझायनर कपडे घालणाऱ्या मोम्फा ज्युनियरला व्हर्साचे आणि गुच्चीसारखे ब्रँड आवडतात. त्याच्याकडे त्याच्या वडिलांकडून भेट म्हणून मिळालेल्या एकाहून अधिक आलिशान गाड्यांचा संग्रह आहे. इस्मालिया मुस्तफा यांचे दुबई आणि नायजेरियासह जगभरात बंगले आहेत.