नक्कल करण सर्वात सोपे काम – कोट्रेल

शमीची नक्‍कल बोचल्याने प्रत्युत्तर

मॅंचेस्टर – विंडीजचे खेळाडू मैदानात आपल्या अनोख्या सेलिब्रेशनसाठीही ओळखले जातात. सध्या विंडीजच्या शेल्डन कॉट्रेलचं विकेट घेतल्यानंतरच सॅल्युट सेलिब्रेशन चांगलच गाजत आहे. त्यात कॉट्रेलने मोहम्मद शमीला बाद केल्यानंतर केलेले सेलिब्रेशन शमीला काहिसे बोचले होते. त्यामुळे शमीनेही कोट्रेल बाद झाल्यानंतर त्याची नक्कल करत त्याला प्रत्युत्तर दिले होते. हेच प्रत्युत्तर बोचल्याने शेल्डन कोट्रेलने शमीला प्रत्युत्तर देत म्हणाला आहे की कोणाचिही नक्‍कल करणे हे खुप सोपे आहे.

भारताविरुद्ध सामन्यात कॉट्रेल बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने कॉट्रेलच्या या सेलिब्रेशन स्टाईलची नक्कल करत त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता शेल्डन कॉट्रेल हे सॅल्युट सेलिब्रेशन आपल्या देशातील पोलिस आणि लष्कराला अभिवादन करण्यासाठी करतो. मात्र शमी आणि भारतीय खेळाडूंनी या प्रकाराची उडवलेल्या खिल्लीमुळे अनेक जण नाराज झाले होते. कॉट्रेलने मात्र शमीच्या या डिवचण्याला जशास तस प्रत्युत्तर दिले आहे. कॉट्रेल हा स्वतः लष्कराचा जवान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.