तृणमूलच्या कार्यकर्त्याची हत्या

24 तासांचा बंद

हुगळी (पश्‍चिम बंगाल) – पश्‍चिम बंगालमधील चुरचुरा गावामध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्याची शनिवारी सकाळी गोळी घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे तृणमूल कॉंग्रेसने या भागात 24 तासांच्या बंदचे आवाहन केले होते. बंदमुळे शहराच्या काही भागामधील दुकाने आणि कार्यालये बंद होती.

पंचायत प्रधान आणि तृणमूलच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नीतू राम यांचे पती दिलीप राम यांची काल सकाळी बांदल जंक्‍शन रेल्वे स्टेशनमध्ये काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरच ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे झारग्राम जिल्ह्यामध्ये आणखी एका व्यक्‍तीला गोळ्या घालून मारण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात खागापती महातो हे गंभीर जखमी झाले असून या हल्ल्यामागे तृणमूल कॉंग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र तृणमूलने हा आरोप फेटाळला आहे. हल्ल्यात जखमी झालेले महातो हे धार्मिक कीर्तनासाठी जात होते.

Leave A Reply

Your email address will not be published.