सानिया मिर्झाची बहिण होणार मोहम्मद अझरुद्दीनची सून

डिसेंबरमध्ये होणार अनम आणि असदचा विवाहसोहळा

नवी दिल्ली : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने तिची बहिण अनम मिर्झा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या मुलासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना आता दुजोरा मिळाला आहे.

बऱ्याच दिवसांपासून अशी चर्चा होती की सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झा मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा असदसोबत लग्न करणार आहे. एवढेच नाही तर कोणीही हे सांगण्यास उघडपणे टाळत नव्हते. पण आता खुद्द सानिया मिर्झाने याची खातरजमा केली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. माझी बहिण डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे. आम्ही नुकतेच पॅरिसहून बॅचलर पार्टी साजरा करून परतलो आहोत आणि आम्ही खूप उत्साही आहोत, असे सानिया मिर्झा म्हणाली आहे. दरम्यान, सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झा पेशाने फॅशन स्टायलिस्ट आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चांना त्यावेळी सुरूवात झाली ज्यावेळी सोशल मीडिया अकाऊंटवर असदसोबतचे फोटो शेअर करताना अनमने ‘फॅमिली’ असे लिहिले होते. दरम्यान, आता खुद्द सानिया मिर्झाने या दोघांच्या लग्नाची पुष्ठी दिली असून यांचा डिसेंबरमध्ये विवाह पार पडणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)