बंगळुरू : चांद्रयान 2 मोहिमेतील क्रिम लॅंडरच्या अपयशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण आणि दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाने इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मोनोधैर्य उंचावले, अशी भावना इस्रोचे प्रमुख के शिवन यांनी रविवारी व्यक्त केली.
पंतप्रधानांचे भाषण आणि देशाने दिलेल्या पाठींब्यामुळे आम्ही आनंदी आहोत. त्यामुळे आमचे मनोधैर्य उंचावले आहे. देशाने दिलेला पाठींबा आणि त्याला पंतप्रधानाषनी दिलेले शब्दरूप यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. त्यांनी (पंतप्रधान) ज्या पध्दतीने ते मांडले… ती उत्कटता… ती भावनाशीलता… अर्थपूर्ण आणि सकारात्म प्रतिसादाने परिपूर्ण होते. यापेक्षा अधिक आम्ही अपेक्षाच करू शकत नाही, असे ते म्हणाले.