चिंबळी -प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत, जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचायत समिती खेड, शिक्षण विभाग अंतर्गत कुरुळी केंद्राची पहिली केंद्रस्तरिय शिक्षण परिषद नुकतीच झाल्याची माहिती केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर व मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी दिली.
जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे, केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने शिक्षण परिषेदेला सुरुवात झाली. गुणवंत शिक्षका व हरित शाळा मानांकन प्राप्त झाल्याबद्द्ल फडकेवस्ती शाळेचा सन्मान यावेळी करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता विकास संस्था, पुणेच्या वरिष्ठ अधिव्याख्यता सुवर्णा तोरणे व सचिन ढोबळे यांनी शिक्षण परिषदेस भेट देऊन, इंग्रजी विषय समृद्धीकरण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेत वंदना गोडसे, मनिषा लोखंडे, तुकाराम वाटेकर यांनी दिशा ऍपचा अध्ययनात वापर, शाळेतील राबवण्याचे विविध उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर, अध्ययन शैली, याविषयी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन तुकाराम वाटेकर यांनी तर संदेश गावडे, तुकाराम भोसकर यांनी आभार मानले.