Rashmika Mandanna – साऊथची स्टार रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) ‘नॅशनल क्रश’ आहे. ‘पुष्पा : द राइज’नंतर रश्मिका घराघरात प्रसिद्ध झाली. चित्रपट हिट झाल्यानंतर रश्मिकाची फॅन फॉलोइंग ज्या वेगाने वाढली आहे, ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. तसं पाहिलं तर रश्मिकाचे जितके चाहते वाढले आहेत तितकेच द्वेष करणारेही उघड्यावर आले आहेत.दरम्यान, अश्यातच अभिनेत्रीचा एक फेक व्हिडिओ व्हायरल (Deepfake Video) करण्यात आला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. ज्यावर आता इंडस्ट्रीसह मोदी सरकारमधील (Modi Sarkar) मंत्रिमंडळातून देखील प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. (Rashmika Mandanna Viral Video)
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. व्हिडिओमधील खऱ्या महिलेचा चेहरा हटवून त्याजागी अभिनेत्रीचा चेहरा एडिट केल्यामुळे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. (Rashmika Mandanna edited video)
या व्हिडिओवर आता केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी देखील भाष्य केले आहे, चंद्रशेखर यांनी एक्सवरून याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. “मोदी सरकार इंटरनेट वापरणाऱ्या सर्व डिजिटल नागरिकांची सुरक्षा आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. एप्रिल २०२३ मध्ये अधिसूचित आयटी नियमांनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी काही गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कोणत्याही युजरद्वारे कोणतीही चुकीची माहिती पोस्ट केली नाही, याची खात्री करा. तसेच कोणत्याही युजरने किंवा सरकारने याबद्दल रिपोर्ट दिल्यानंतर चुकीची माहिती ३६ तासांत काढून टाकली जाईल याची खात्री करा. जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने याचे पालन केले नाही तर, नियम ७ लागू होईल आणि प्लॅटफॉर्मविरोधात आयपीसीच्या तरतुदींनुसार पीडित व्यक्ती न्यायालयात जाऊ शकते. याशिवाय डीप फेक हे लेटेस्ट तंत्रज्ञान असून खूप धोकादायक आणि हानीकारक आहे. त्यामुळे चुकीची माहिती पसरवण्याच्या बाबतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे हे योग्य पद्धतीने हाताळले जाणे आवश्यक आहे” असं ट्विट चंद्रशेखर यांनी म्हंटल आहे.
PM @narendramodi ji’s Govt is committed to ensuring Safety and Trust of all DigitalNagriks using Internet
Under the IT rules notified in April, 2023 – it is a legal obligation for platforms to
➡️ensure no misinformation is posted by any user AND
➡️ensure that when reported by… https://t.co/IlLlKEOjtd
— Rajeev Chandrasekhar 🇮🇳 (@Rajeev_GoI) November 6, 2023
दरम्यान, हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की तो थेट महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या पर्यंत पोहोचला. त्यांनी देखील या व्हिडिओवर आक्षेप घेत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. बच्चन यांनी व्हिडिओ रिट्विट करत होय, “ही कायदेशीर केस असल्याचे सांगितले’. (Rashmika Mandanna Viral video)
Deep Fake म्हणजे काय? वाचा….
हा सिंथेटिक मीडियाचा प्रकार आहे. एखादा फोटो किंवा व्हिडिओतील व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याने रिप्लेस करता येतो. अशा पद्धतीने बनावट फोटो किंवा व्हिडिओ बनवणे यात फारसे काही नवीन नाही. पण Deep Fake मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून अतिशय तंतोतंत बनावट व्हिडिओ किंवा फोटो बनवला जातो. चेहऱ्यावरील अनैसर्गिक भाग, डोळे आणि डोके यांच्यात समन्वय नसणे यातून Deep Fake व्हिडिओ ओळखता येतो.