शांघाय सहकार्य परिषदेत मोदी-इम्रान खान भेट नाही

परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टिकरण

नवी दिल्ली- पुढील आठवड्यात किरगीझीस्तानची राजधानी बिश्‍केक येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट होण्याची शक्‍यता नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्यवतीने स्पष्ट करण्यात आले आहे. आपल्या माहितीनुसार दोन्ही पंतप्रधानांच्या भेटीचे कोणतेही नियोजन झाले नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी सांगितले.

बिश्‍केक इथे 13 आणि 14 जून रोजी मोदी आणि इम्रान खान दोघेही उपस्थित राहणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पुलवामा हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्ताननेही भारतीय हद्दीमध्ये हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

हा तणाव निवळण्याच्यादृष्टीने इम्रान खान यांनी 26 मे रोजी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती आणि शांततामय मार्गाने समृद्धीसाठी एकत्र काम करण्याची ईच्छा व्यक्‍त केली होती. दुसरीकडे मोदींनीही दहशतवाद आणि हिंसाचारमुक्‍त वातावरणात विश्‍वास निर्माण करण्यावर भर दिला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)