मोदींच्या विमानाला पाकिस्तानची हवाईहद्द बंदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावेळी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून नेण्याची भारताने केलेली विनंती पाकिस्तानने फेटाळली. ही विनंती राजशिष्टाचारानुसार केली होती. तरीही पाकिसातानने आडमुठेपणा कायम ठेवत ती फेटाळली. त्यामुळे मोदी यांच्या विमान प्रवासाला 45 ते 50 मिनिटांचा अधिक वेळ लागणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या युरोप दौऱ्यावेळीही अशीच विनंती पाकिस्तानने फेटाळली होती. भारताने काश्‍मिरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा आडनुठेपणा वाढला आहे. जवळपास सर्व जागतिक समुहासमोर अयशस्वी आदळआपट केली. त्यातही त्या देशाला अपयश आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.