पुणे – महाराष्ट्र नवर्निमाण सेना विधी कक्ष महाराष्ट्र राज्यच्या उपाध्यक्षपदी येथील ॲड. सतिश कांबळे यांची निवड झाली आहे. याबाबत त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले.
त्यावेळी शहराध्यक्ष वसंत मोरे, बाबु वागस्कर, किशोर शिंदे, गणेश सातपुते यांच्यासह मनसेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ॲड. कांबळे हे मनसे विधी सेवा कक्षाचे शहराध्यक्ष होते. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पुणे वकील सोसायटीचे अध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या शिस्तपालन समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे.