नवी दिल्ली – युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणानंतर एक भारतीय युवक युकेनच्या बाजूने लढत आहे. त्याने भारतीय लष्करात दाखल होण्यासाठी अर्ज केला होता. मात्र संधी न मिळल्याने वैद्यकीय शिक्षनअसाठी तो युक्रेनला गेला होता.
तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील सैनिकेश रविचंद्रन हा 21 वर्षीय विद्यार्थी रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनच्या निमलष्करी दलात सामील झाला आहे. रविचंद्रनच्या पालकांशी संवाद साधला असता, त्याने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला होता पण तो नाकारण्यात आला होता.
युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात युक्रेनच्या सैनिकांसोबतच सामान्य युक्रेनियन नागरिकही लढाईत उतरल्याचे समोर येत आहेत. आता युक्रेनच्या सैन्याला भारतीयांसह इतर अनेक देशांतील लोकांचा पाठिंबा मिळत आहे. किव्ह इंडिपेंडंटने युक्रेनच्या लष्कराच्या हवाल्याने म्हटले आहे की रशियाच्या विरोधात अमेरिका, ब्रिटन, स्वीडन, लिथुआनिया, मेक्सिको आणि भारतातील लोक लढत आहेत.
रविचंद्रन 2018 मध्ये अभ्यासासाठी युक्रेनच्या खार्किव शहरात गेला होता. त्याचा अभ्यासक्रम 2022 मध्ये पूर्ण होणार होता. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रविचंद्रन यांच्या कुटुंबाचा संपर्क तुटला होता. दूतावासाची मदत घेतल्यानंतर कुटुंबीयांनी रविचंद्रन यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनच्या निमलष्करी दलात सामील झाल्याचे रविचंद्रनने कुटुंबीयांना सांगितले आहे.
युक्रेनने परदेशी लोकांसाठी आंतरराष्ट्रीय सैन्य’ स्थापन केले आहे आणि राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी जाहीरपणे परदेशी लोकांना रशियाच्या गुन्हेगारांविरुद्ध युक्रेनियन लोकांच्या खांद्याला खांदा लावून लढा असे आवाहन केले. गेल्या आठवड्यात, झेलेन्स्की यांनी 16,000 हून अधिक परदेशी स्वेच्छेने आमच्या लढ्यात सामील झाले आहेत असे म्हटले होते.