तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील सुरू असलेल्या विविध रस्त्याच्या कामांची आमदार सुनिल शेळके यांनी अधिकारी व ठेकेदारांसह पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता वैशाली भुजबळ, पीएमआरडीए सदस्य संतोष भेगडे, उद्योजक विलास काळोखे, माजी नगरसेवक यादवेंद्र खळदे, चंद्रभान खळदे, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, अरुण माने, दिलीप खळदे, आशिष खांडगे, तुषार काळोखे आणि अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.
तळेगाव शहरात अनेक रस्त्यांची कामे संथगतीने सुरू होती तसेच काही रस्त्यांची कामे ठेकेदार दर्जेदार करत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी रस्त्यांच्या कामांचा पाहणी दौरा करत 30 मे पर्यंत शहरातील सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या संबंधित ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत. तसेच आपल्या परिसरात सुरू असलेल्या कामांवर नागरिकांनीदेखील लक्ष द्यावे, असे आवाहन यावेळी नागरिकांना केले.
या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार शेळके यांनी तळेगाव ते सोमाटणे फाटा यांना जोडणाऱ्या व नव्याने होत असलेला रस्ता, तळेगावातील श्री शिवाजी टॉकीजलगत तांबोळी यांचे घर ते राम मंदिर व सुभाष मार्केट पर्यंतचा रस्ता, अशा एकूण 10 कोटी 13 लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली