पुणे -राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल लागताच दुसऱ्या दिवसापासून पदवी प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात न जाता ऑनलाइन पद्धतीने वेळेत अर्ज करावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांना पदवी प्रवेशाची उत्सुकता असते. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे एमएचटी-सीईटीच्या निकालाकडे लक्ष असते. त्यापूर्वी एखाद्या महाविद्यालयात पदवी प्रवेशासाठी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करणे योग्य ठरणार आहे. तसेच कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशाला प्राधान्य देतात. या सर्व पार्श्वभूमीवर बहुतांश वरिष्ठ महाविद्यालयाकडून शुक्रवारपासून ऑनलाइन अर्जासाठी लिंक खुली केले जाणार असल्याचे चित्र दिसून येते. बृहन महाराष्ट्र ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) आणि फर्गसन महाविद्यालयातील पदवी प्रवेश उद्यापासून सुरू होणार आहे.
शिवाजीनगर, मॉडर्न महाविद्यालयचे प्राचार्य राजेंद्र झुंजारराव म्हणाले, आमच्या महाविद्यालयात पदवी प्रवेशासाठी उद्या सकाळी दहा वाजल्यापासून अर्ज करता येणार आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी अर्जाची मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर चार-पाच दिवसांत मेरिट लिस्ट जाहीर होईल. त्यानुसार पदवी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येईल.
मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य देविदास गोल्हार म्हणाले, पदवीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरू करण्यात आली.
आतापर्यंत तीनशे विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 4 जूनला प्रवेशाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्व माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उत्तीर्ण तृतीयपंथी विद्यार्थी : 33
राखीव निकाल : 232
तोतया विद्यार्थी : 23
सवलतीच्या गुणांचा लाभ मिळालेले विद्यार्थी (विभागनिहाय)
पुणे :3,597
नागपूर :1,690
औरंगाबाद :1,00 5
मुंबई :4,024
कोल्हापूर :2,121
अमरावती :1,449
नाशिक :2,199
लातूर :935
कोकण :1,028
एकूण :18,048
विद्यार्थी संख्या
90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण : 7 हजार 696
85 ते ते 90 टक्के : 19 हजार 569
80 ते ते 85 टक्के : 39 हजार 52
75 ते 80 टक्के : 65 हजार 356
70 ते 75 टक्के : 96 हजार 400
65 ते 70 टक्के : 1 लाख 31 हजार 413
60 ते 65 टक्के : 1 लाख 85 हजार 559
45 ते 60 टक्के : 5 लाख 83 हजार 271
45 टक्क्यांपेक्षा कमी : 1 लाख 79 हजार 927
गेल्या पाच वर्षांचा निकाल
2018 – 88.41 टक्के
2019 – 85.88 टक्के
2020 – 90.66 टक्के
2021 – 99.63 टक्के
2022 – 94.22 टक्के