दुबई – टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या बेपत्ता झालेल्या पाणबुडीतील ऑक्सिजनचा साठा संपत चालला आहे. त्यामुळे या पाणबुडीमध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या जिवाला असलेला धोका वाढतच चालला आहे.
या पाणबुडीमध्ये 96 तास पुरेल एवढा ऑक्सिजन होता. अजूनही पाणबुडीचा शोध न लागल्यामुळे शोध घेणाऱ्या पथकासमोर या 5 पर्यटकांना वाचवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
या पाणबुडीच्या शोधासाठी कनेक्टिकटपासून हजारो मैलांचे सागरी अंतर अडीच मैल खोल समुद्रामध्ये दोन वेळा तपासून झाले आहे.
विमाने, जहाजे, रिमोटने नियंत्रित केली जाणारी पाण्याखालील बोटी आणि अमेरिकेच्या नौदलाच्या विशेष बचाव वाहनांच्या मदतीने हा शोध घेतला जात आहे.